यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबानी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगितले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबानी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे, नागपूरमधील दीक्षा भूमीचे जतन संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबाना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे, राज्यात देखील हा दिवस आपण साजरा होत असल्याचे सांगितले.
advertisement
वाचा - 'जागा वाटपामुळे सर्वच...'; वर्षा गायकवाड यांच्या दिल्लीवारीवर पटोले स्पष्टच बोलले
सध्या मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. उलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण त्यांनी करून दिली.
यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर आणि नागसेन कांबळे आणि असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते.
