हल्ला करणारा नेमका कोण होता? त्याने हत्या का केली? याची कसलीही माहिती जखमी कारखानादाराला आणि इतरांना माहीत नव्हती. शिवाय आरोपीकडे मोबाईल फोनही नव्हता. त्यामुळे त्याला स्ट्रेस करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण पोलिसांनी अवघ्या काही तासात हत्येचा उलगडा केला आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
साहिल दिनेशकुमार मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर अरमान शाह असं हत्या झालेल्या २३ वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या बहिणीशी मृत तरूणासोबत प्रेमसंबंध होते. त्याचा रागातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
advertisement
धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीतील पुनावाला चाळीत राहणारा मयत अरमान शाह (२३) एका कपड्यांच्या कारखान्यात काम करत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. मुलीचा भाऊ साहील उर्फ प्रितेश मिश्रा (२२) हा बुधवारी रात्री अरमान काम करत असलेल्या कारखान्यात गेला. अरमानला त्याने बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर प्रितेशने अरमानच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि त्याच्यावर चाकुने वार केले होते.
यावेळी कारखाना मालक अश्रफ मोहम्मद मतीन शेख पुढे आले, त्यांनी अरमानला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी साहिलने त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अरमानचा जागीच मृत्यू झाला, तर कारखाना मालक मतीन शेख जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.