TRENDING:

अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भरले अर्ज

Last Updated:

अरुण गवळी उर्फ डॅडी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. अरुण गवळी उर्फ डॅडी सक्रिय राजकारणात उतरणार नसले तरी त्यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असून माजी नगरसेविका गीता गवळी आणि योगिता अरूण गवळी यांनी भरला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.
News18
News18
advertisement

मुंबई महानगरपालिका या तोंडावर असून सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अरुण गवळींची अखिल भारतीय सेना देखील तयारीत आहे. काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढणार आहे. योगिता गवळी हिने आपली काकी वंदना गवळी यांच्या विरोधात 207 मधून अर्ज भरला आहे.

advertisement

भायखळ्यातील 212 आणि 207 या दोन वाॅर्डांवर अरुण गवळीचे वर्चस्व

भायखळ्यातील 212 आणि 207 या दोन वाॅर्डांवर अरुण गवळीचे वर्चस्व आहे. गवळीची मुलगी गीता आणि भावजई वंदना येथून विनासायास निवडून यायच्या. गवळी यांच्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या विरोधात शिवसेना उमेदवार देत नसे, मात्र यंदा सगळीच गणिते बदलली असून आगामी निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. त्यामुळे ते इथे उमेदवार देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

advertisement

 अरुण गवळीची मुलगी गीता मतदारसंघात लोकप्रिय

अंडरवर्ड डॉन अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा गवळी मागील 18 वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न करत होता. जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 18 वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आला. शिवसेना नेत्याची हत्या केल्याच्या आरोपातून अरुण गवळी तुरुंगात आहे. त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी गीता गवळी पुढे नेत होत्या. या अगोदर गीता गवळी या प्रचंड मताने निवडुन आल्या आहेत. डॉनची मुलगी असली तरी गीता आपल्या मतदारक्षेत्रात लोकप्रिय आहेत. या मततदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

काल तडकाफडकी राजीनामा, आज शिंदेंचा फोन येताच बंडाची तलवार म्यान, महापालिका निवडणुकीआधी ठाण्यात घडामोडींना वेग

मराठी बातम्या/मुंबई/
अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भरले अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल