काल तडकाफडकी राजीनामा, आज शिंदेंचा फोन येताच बंडाची तलवार म्यान, ठाण्यात वेगवान घडामोडी!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून विक्रांत वायचळ यांच्यावर कारवाई केल्याने मिनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.
ठाणे : विश्वासू पदाधिकाऱ्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केल्याने ठाणे शहराच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षात खळबळ उडाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधून चर्चा केल्यानंतर मिनाक्षी शिंदे यांनी बंडाची तलवार म्यान केली.
शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी काम केल्याबद्दल, विक्रांत वायचळ शाखाप्रमुख निर्मल आनंदनगर (मनोरमा नगर) ठाणे, यांना काही दिवसांपूर्वी शाखाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात आले होते. मनोरमा नगर प्रभाग क्रमांक तीनमध्ये शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी स्थानिक नगरसेवकच हवा, अशी मोहीम उघडली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
advertisement
एकनाथ शिंदे यांचा मिनाक्षी शिंदे यांना फोन
विक्रांत वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याच कारणातून कलह होऊन मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षात काम करण्याची संधी दिल्याचे सांगत मिनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या त्यांच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन करून घडलेल्या घडामोडींची माहिती घेतली. तसेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
advertisement
बंड करण्याचा प्रश्नच नाही, शिवसेना सोडण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही
शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही. पक्ष सोडण्याचा निर्णय माझ्या मनातही येणार नाही. एका घडामोडीमुळे मी प्रचंड दु:खी झाले होते. मात्र पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून घडलेल्या घटनेची माहिती घेतली, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.
भूषण भोईर यांना तिकीट मिळणार?
advertisement
भूषण भोईर यांना तिकीट देऊ नये, यासाठी शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी आंदोलन केले होते. याच आंदोलनाची दखल घेऊन पक्षनेतृत्वाने वायचळ यांच्यावर कारवाई केली होती. आता भोईर यांच्या अनुषंगाने पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार? भोईर यांना तिकीट देणार का? हे पाहावे लागेल.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काल तडकाफडकी राजीनामा, आज शिंदेंचा फोन येताच बंडाची तलवार म्यान, ठाण्यात वेगवान घडामोडी!








