Thirty First Party साठी आईबाबा नाही म्हणणारच नाही, हसत हसत पाठवतील; परमिशन मागताना वापरा ही सोपी ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Thirty First Party : थर्टी फर्स्ट पार्टीसाठी पालकांना कसं मनवायचं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर तुमचं हे टेन्शन आम्ही हलकं करतो. पालक परमिशन देतील अशा काही ट्रिक आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत.
ख्रिसमस झाला आता थर्टी फर्स्ट पार्टीची तयारी सुरू झाली, कुणाचा प्लॅन झाला असेल कुणी प्लॅन करत असेल. थर्टी फर्स्ट पार्टी म्हणजे बहुतेक जण मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जातात आणि थर्टी फर्स्ट पार्टी म्हणजे बहुतेकांच्या डोक्यात असतं ते दारू, क्लब वगैरे. त्यामुळे कित्येक पालक आपल्या मुलांना थर्टी फर्स्ट पार्टीसाठी पाठवत नाहीत. थर्टी फर्स्ट पार्टीसाठी आई-वडिलांकडून परमिशन घेताना टोन, टाइमिंग आणि ट्रस्ट हे तीन शब्द लक्षात ठेवले तर काम सोपं होतं.
advertisement
परमिशन घेण्यासाठी योग्य वेळ निवडा. घाईत, रागात किंवा पाहुणे असताना विषय काढू नका. शांत वेळ म्हणजे जेवणानंतर किंवा संध्याकाळी विचारा. पण त्याआधी मूड सामान्य आहे, ठिक आहे याची खात्री करा थेट पार्टी शब्दाने सुरुवात टाळा. मला 31st पार्टीला जायचंय असं म्हणण्याऐवजी आमच्या फ्रेंड्सचं छोटं गेट टूगेदर आहे, असं सांगा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










