निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंब जेलबाहेर येणार, पोलीस संरक्षणात भरणार अर्ज; कोर्टाचा आदेश
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आता आगामी पुणे महानगरपालिका लढवणार आहे. फक्त बंडूच नाही तर त्याच्याच कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आंदेकर कुटुंब आता जेलमधून लढवणार निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आगामी पुणे महानगरपालिक निवडणुकांसाठी आंदेकर कुटुंब इच्छुक आहे. त्यामुळे आंदेकर कुटुंब पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास न्यायालयाने परवानगी दिली असून, या प्रक्रियेदरम्यान कडक पोलीस सुरक्षा पुरवण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार आंदेकर कुटुंबाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस एस्कॉर्ट व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आंदेकर कुटुंबाला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
आंदेकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या
यापूर्वी न्यायालयाने लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्याचवेळी त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते. त्यामुळे या तिघांनाही सध्या न्यायालयीन कोठडीत राहावे लागत आहे. जामीन नाकारण्यात आल्याने आंदेकर कुटुंबाच्या अडचणी वाढल्या असल्या, तरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे.
advertisement
आंदेकर कुटुंब जेलमधूनच निवडणूक लढवणार
न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे आता आंदेकर कुटुंब जेलमधूनच निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पोलीस बंदोबस्तात कारागृहातून बाहेर नेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
advertisement
दरम्यान, आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. न्यायालयीन कोठडीत असतानाही निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात आंदेकर कुटुंबाचा निवडणूक प्रचार कसा होणार आणि मतदारांचा प्रतिसाद काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंब जेलबाहेर येणार, पोलीस संरक्षणात भरणार अर्ज; कोर्टाचा आदेश










