Soak Grains : डाळी, कडधान्य भिजवल्यावर पाण्याला फेस का येतो, तो चांगला की खराब?

Last Updated:
Foam On Soak Grains Lentils : डाळी, कडधान्ये भिजवल्यावर पाण्यावर येणारा फेस कसला असतो, तो का येतो? माहिती आहे का? तर यामागे अनेक कारणं आहेत.
1/5
सामान्यपणे आपण डाळी, कडधान्य भिजवून मग ते शिजवतो. यामुळे ते पटकन आणि चांगले शिजतात. पण तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की जेव्हा आपण कडधान्य भिजवतो तेव्हा पाण्यावर एक पांढरा फेस येतो? हा फेस नेमका कसला, तो का येतो? चांगला की खराब असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. डाळ-कडधान्य

advertisement
2/5
डाळ-कडधान्यांच्या सालीत सॅपोनीन नावाचं नैसर्गिक रसायन असतं. हे पाण्यात मिसळलं की साबणासारखा फेस तयार करतो विशेषतः हरभरा, चवळी, राजमा, सोयाबीन यात जास्त असतं. दुसरं म्हणजे डाळी कडधान्य बाजारात उघड्या पोत्यांत साठवल्या जातात. त्यामुळे त्यात धूळ, माती, सूक्ष्म कण असतात.  हे पाण्यात मिसळून फेस तयार करतात.

3/5
तिसरं म्हणजे डाळ, कडधान्यांमध्ये फायटिक अ‍ॅसिड, लेक्टिन्स असे अँटि न्यूट्रिएंट्स असतात, भिजवल्यानंतर ते बाहेर पडतात आणि पाण्यात उतरतात.  यामुळेही फेस दिसू शकतो. हे घटक पचनाला अडथळा आणणारे असतात.

4/5
आता हा फेस चांगला वाईट. तर थोडा फेस चांगला आहे, कारण ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. डाळ, कडधान्य चांगलं भिजल्याचं ते लक्षण आहे, पचनासाठी फायदेशीर घटक सक्रिय होत आहेत. पण खूप जास्त फेस आणि पाण्यात आंबट, कुजलेला वास येत असेल तर मात्र तो वाईट. कडधान्य जुनं किंवा खराब असण्याची शक्यता असते.

5/5
कडधान्य भिजवल्यावर येणारा हा फेस चांगला असो वा वाईट ते पाणी फेकून द्यायचं, ते वापरायचं नाही. भिजवल्यावर कडधान्य हलकं चोळून धुतल्यास जास्त फेस निघून जातो डाळ-कडधान्य 2–3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मगच शिजवावी.

Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement