बालपणीच गेले वडिल, PCO बूथ, ज्वेलरी शॉपमध्ये केलं काम; आज आहे फिल्म इंडस्ट्रीची दत्तक अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ही अभिनेत्री इंडस्ट्रीची दत्तक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कधी PCO बुथ तर कधी ज्वेलरी शॉपमध्ये ती काम करतेय. आज ती गेली 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय.
मनोरंजन विश्वातील झगमगत्या जगात येण्यासाठी कलाकारांना अनेक गोष्टींचा समाना करावा लागतो. प्रत्येक कलाकाराच्या मागे एक स्ट्रगल स्टोरी आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री जी अभिनय क्षेत्रात येण्याआधी PCO बुथवर काम करत होते. इतकंच नाही तर ज्वेलरी शॉपमध्येही तिनं काम केलं आहे. तिचा आजवरचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे.
advertisement
advertisement
advertisement
अभिनेता नेहा गेली 12 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय. नेहाने तिच्या स्ट्रलग विषयी सांगताना म्हटलं होतं, "माझा बालपण खूप समस्यांनी भरलेलं होतं. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. पण मी अभ्यासात चांगली होते म्हणून शाळेनं माफी फी माफ केली. हॉटेल मॅनेजमेन्टच्या शिक्षणासाठी मी लोन घेतलं होतं. खूप कमी वयात मी शिक्षणासोबत काम करायला सुरुवात केली."
advertisement
नेहा पुढे म्हणाली, "मी पीसीओ बूथ पासून ज्वेलरी शॉपमध्येही काम केलं. मी खूप जबाबदार आणि समजूतदार झाले. मी सर्वात आधी माझ्या आईला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित केलं. मी सगळे लोन फेडले आणि त्यानंतरच माझी स्वप्न साकार करण्यासाठी साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. इथूनच माझा आणखी एक संघर्ष सुरू झाला. उत्तरेकडून आलेल्या मुलीला साऊथमध्ये आपली जागा मिळणवं खूप कठिण होतं."
advertisement
advertisement
advertisement










