नागपूरच्या वर्धा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. नागपूरमध्ये काल नाताळनिमित्त अनेक पब आणि बार चालू ठेवण्यात आले होते. त्यातील डाबो पबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हा पबमध्ये दोन युवकांच्या टोळीत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, त्या वादानंतर एका मुलावर 4-5 जणांनी हल्ला केला आणि त्या मुलाची हत्या झाली. ही घटना प्राईड हॉटेल परिसरातील आहे.सोनेगाव पोलीसात या घटनेचा गुन्हा दाखल केला गेला. पण वादाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव प्रणय नारनव असं आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 16:47 IST


