TRENDING:

Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री

Last Updated:

Bullet Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि गुजरातमधील अहमदाबाद या दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी सरकारने एक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतलेलेा आहे. दोन्ही शहरांदरम्यान लवकरच बुलेट ट्रेन धावणार आहे. सध्या प्रकल्पाचे अतिशय वेगात काम सुरू आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच सुरू होणार असून मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किलोमीटर अंतर अवघे दोन तास सात मिनिटांत पार होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. गुजरातमधील भावनगर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येईल. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन सुरू होऊन वापी, सुरत, वडोदरामार्गे अहमदाबादला पोहोचणार असल्याचे वैष्णव म्हणाले. सध्या देशात दररोज सरासरी 12 किलोमीटर नवा रेल्वेमार्ग तयार केला जात आहे, असा दावाही रेल्वेमंत्र्यांनी केला.

advertisement

Mumbai Local: साध्या लोकलला आता ऑटोमॅटीक दरवाजे, मध्य रेल्वेची तयारी, नेमके बदल काय?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 12 स्टेशन्स असतील. मार्गातील नद्यांवरील अनेक मोठे नपूल, स्टील आणि पीएससी ब्रिज (काँक्रीटचे पूल) आणि काही रेल्वे स्टेशन्सच्या इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. 2026 मध्ये जपानमधून बुलेट ट्रेनचे डबे येण्याची शक्यता आहे. 2029 पर्यंत ही ट्रेन सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

advertisement

पुणे ते रीवा प्रवासाचा वेग वाढला

भावनगर येथून तीन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनबाबत अधिक माहिती दिली. भावनगर टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमात, भावनगर-अयोध्या कँट (आठवड्यातून एकदा), पुणे (हडपसर)- रीवा सुपरफास्ट (आठवड्यातून एकदा) आणि रायपूर-जबलपूर (दररोज) या तीन नव्या गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद अवघ्या दोन तासांत, काय म्हणाले रेल्वे मंत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल