वारिस पठान यांनी म्हटलं की, व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की एका मुसलमान तरुणाला मारलं जात होतं. जय श्री राम घोषणा देत होते. तरुणाने लव्ह जिहाद केल्याचं म्हणत होते. लव्ह जिहादची कन्सेप्टच नाही. तुम्ही कायदा का हातात घेताय, तुम्हाला जर काही माहिती होतंय, तर कायदा हातात घेऊन त्याला मारहाण का करताय, पोलीस प्रशासन काय करतंय? असे प्रश्नही त्यांनी विचारले.
advertisement
देशासाठी ज्यांनी प्राण गमावले, त्यांनी कधीही असा विचार केला नसेल. या घटनेत कोणी दोषी असतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा करा.
असा पद्धतीने वातावरण बिघडवणार तर काय होईल. वांद्र्यात घ़डलं. मला माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वीचा आहे. एक हवालदार हे उभा राहून बघत आहे. त्याने तक्रार का नाही केली. त्याची चौकशी करावी लागेल अशी मागणी वारिस पठाण यांनी केली.
नीलिमा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, अहवालातून समोर आलं मृत्यूचं कारण
व्हिडीओत बांद्रा टर्मिनस परिसरात काही जण एका तरुणाला ओढत नेत असल्याचं दिसतं. याशिवाय त्याला मारहाण करताना जय श्रीराम अशा घोषणाही दिल्या गेल्या. एका तरुणाने यावेळी असाही दावा केला की संबंधित तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीला घेऊन निघाला होता. तिला आम्ही वाचवलं. याशिवाय आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात स्टेशनवर बसवून त्या तरुणाला मारहाण केली गेली.
वांद्रा स्टेशनवर एका मुस्लिम तरुणाला लव्ह जिहादचा आरोप करत हिंदुत्त्ववाद्यांनी बेदम मारहाण केली. आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना कधीही असा विचार केला नव्हता की देशात मुस्लिमांना असा दिवस पहावा लागेल. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करावी. यापुढे असा घटना करण्याआधी १०० वेळा विचार केला पाहिजे अशी शिक्षा व्हायला हवी असंही वारिस पठाण यांनी म्हटलं.