भारत सरकारच्या नामांकित कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 12 जानेवारी 2026 पर्यंत BHEL च्या अधिकृत careers.bhel.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी उमेदवारांकडे फुलटाइम इंजीनिअरिंग किंवा टेक्नोलॉजीमधील पदवी अथवा संबंधित विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी किमान 60 टक्के गुणांची अट आहे, तर SC/ST उमेदवारांसाठी 50 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. तसेच किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
advertisement
प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी संबंधित शाखेतील इंजीनिअरिंग डिग्री आणि किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 25 ते 32 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
पगार असणार किती?
प्रोजेक्ट इंजीनिअर पदासाठी दरमहा 95,000 ते 1 लाख रुपये वेतन मिळणार असून प्रोजेक्ट सुपरवायझर पदासाठी 45,000 ते 48,000 रुपये मासिक पगार दिला जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना 236 रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. भरतीविषयी सविस्तर माहिती आणि अधिसूचना BHEL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
