मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी कर्नाक बंदर पुलाच्या कामासाठी मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत मध्य रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुख्य मार्गावर लोकल भायखळा स्थानक, परळ स्थानकापर्यंतच चालवल्या जातील. तर, हार्बर मार्गावर लोकल ही वडाळा स्थानकापर्यंतच असेल.
मध्य रेल्वेचे असे असेल वेळापत्रक -
advertisement
मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे सीएसएमटी येथून शेवटची कसारा लोकल 12.14 वाजता सुटेल. तर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल कल्याण येथून 10.34 वाजता सुटेल.
डाउन मार्गावरील सकाळची पहिली लोकल सीएसएमटी येथून कर्जतसाठी 4.47 वाजता सुटेल. तर अप मार्गावरील सीएसएमटीसाठी पहिली लोकल ठाणे येथून पहाटे 4 वाजता सुटेल.
हार्बर रेल्वेचे असे असेल वेळापत्रक -
हार्बर मार्गावर पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री 12.13 वाजता सुटेल. अप मार्गावर सीएसएमटीसाठी शेवटची लोकल पनवेलहून 10.46 वाजता सुटेल. सकाळी सीएसएमटीवरुन पहिली लोकल 4.52 वाजता सुटेल आणइ वांद्रे येथून सीएसएमटीसाठीची पहिली लोकल 4.17 ला सुटेल.
कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल
या एक्स्प्रेस असणार फक्त दादरपर्यंतच
1) हावडा- सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस
2) अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस
3) मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस
4) मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
5) भुवनेश्वर - सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
6) हावडा- सीएसएमटी मेल