कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल

Last Updated:

नोकरी गेल्यानंतर पप्पू शिंदे गावी परतले. भूम शहरात म्हणजेच गावाकडे आलेल्या शिंदे यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. मात्र, परंतु आर्थिक पाठबळ नव्हते.

+
पप्पू

पप्पू शिंदे

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : कोरोनाच्या महासंकटांत अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर अनेकांचे उद्योगधंदे, व्यवसायही ठप्प झाले. अशातच एक तरुण होता, ज्याचीसुद्धा कोरोनाकाळात नोकरी गेली. नंतर तो गावी परतला आणि व्यवसाय करण्याच्या विचारात होता. त्याला मार्केटिंगची माहितीही नव्हती. मात्र, त्याने लाकडी तेल घाण्याच्या व्यवसायात 4 ते 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि आपला व्यवसाय सुरू केला. मेहनतीने तो पुढे नेत राहिला आणि आज हा तरुण महिन्याला आपल्या स्वत:च्या व्यवसायातून महिन्याला 40 ते 50 हजार रुपयांची कमाई करत आहे.
advertisement
पप्पू शिंदे असे या व्यक्तीचे नाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक जण पुण्यात कंपनीत काम करतात. भूम शहरातील पप्पू शिंदे यांनीही पुण्यात एका कंपनीत सीनियर सुपरवायझर पदावर कामाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना महिना 35 हजार रुपयांची नोकरी मिळाली. मात्र, कोरोनामुळे कंपन्या बंद झाल्या आणि पप्पू शिंदे त्यांचीही नोकरी गेली.
advertisement
नोकरी गेल्यानंतर पप्पू शिंदे गावी परतले. भूम शहरात म्हणजेच गावाकडे आलेल्या शिंदे यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. मात्र, परंतु आर्थिक पाठबळ नव्हते. म्हणून कोणता व्यवसाय सुरू करावा, याचा विचार त्यांनी अनेकदा केला. व्यवसायाची माहिती नव्हती, मार्केटिंग कसं करावं, याचीही माहिती नव्हती.
3 वर्षांपूर्वी भूम शहरातील कुसुम नगर भागात त्यांनी लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यासाठीही स्वतःकडे भांडवल नव्हते. स्वतःकडे असलेली रक्कम आणि उर्वरित रक्कम पाहुण्यांकडून गोळा करून त्यांनी 4 ते 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि लाकडी तेल खाण्याचा व्यवसाय सुरू केला.
advertisement
माझी लाडकी बहीण योजना : फॉर्म भरताना चुकला तर आता चिंता नको, अशी पद्धतीने करता येणार दुरुस्ती
आता त्यांना महिन्याकाठी 40 ते 50 हजार रुपयांची कमाई होत आहे. तर दीड ते 2 लाख रुपयांची महिन्याकाठी उलाढाल होत असल्याची माहिती, पप्पू शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement