माजी आमदार आणि भाजप नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12: 30 वाजता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.
advertisement
1995 आणि 1999 अशा सलग दोन टर्म रमेश कुथे हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर होते. त्यानंतर 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.