मुंबईमध्ये आधी भाजपचे 20 बंडखोर उभे होते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आलं आणि 14 बंडखोरांनी त्यांचे अर्ज मागे घेतले, पण 6 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. तर संभाजीनगरमध्ये भाजपच्या तब्बल 69 बंडखोरांनी अर्ज दाखल केला होता, यातल्या 54 जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 15 बंडखोर रिंगणात आहेत. नागपूरमध्ये 15 पैकी 6 जणांनी अर्ज मागे घेतले असून 9 बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. दरम्यान मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 बंडखोर उमेदवार कायम आहेत.
advertisement
मुंबईमधील भाजपचे बंडखोर
| वॉर्ड क्रमांक | बंडखोर उमेदवार | अधिकृत उमेदवार |
| वॉर्ड 60 | दिव्या ढोले | सायली कुलकर्णी |
| वॉर्ड 173 | शिल्पा केळुसकर | पूजा कांबळे |
| वॉर्ड 205 | जान्हवी राणे | वर्षा शिंदे |
| वॉर्ड 177 | नेहल शाह | कल्पेशा जेसल कोठारी |
| वॉर्ड 180 | जान्हवी पाठक | तृप्ती विश्वासराव |
मुंबईमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर
| वॉर्ड क्रमांक | बंडखोर उमेदवार | अधिकृत उमेदवार |
| वॉर्ड 193 | सूर्यकांत कोळी | हेमांगी वरळीकर |
| वॉर्ड 197 | श्रावणी देसाई | रचना साळवी (मनसे) |
| वॉर्ड 196 | संगीता जगताप | पद्मजा चेंबुरकर |
| वॉर्ड 202 | विजय इंदुलकर | श्रद्धा जाधव |
| वॉर्ड 205 | दिव्या बडवे | सुप्रिया दळवी (मनसे) |
| वॉर्ड 106 | सागर देवरे | |
| वॉर्ड 159 | कमलाकर नाईक | प्रविणा मोजारकर |
| वॉर्ड 95 | चंद्रशेखर वायंगणकर | हरिश शास्त्री |
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे, त्याआधीच भाजपचे 44 आणि शिवसेनेचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यातल्या सगळ्या महापालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराला आता शनिवारपासून सुरूवात होणार आहे. 15 जानेवारीला या निवडणुकांचं मतदान पार पडेल तर 16 जानेवारीला निकाल लागतील.
