चंद्रशेखर दवे असं आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचं नाव आहे. ते मुंबईच्या बोरिवली परिसरात वास्तव्याला होते. मिळालेल्या माहितीनुसार, दवे यांचा बोरिवली येथे 'गायत्री ऑप्टिशियन' नावाने चष्माविक्रीचा व्यवसाय होता. या व्यवसायात मेहुणा योगेश रावल हे त्यांचे भागीदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी योगेश रावल हे चंद्रशेखर दवे यांच्यावर सतत दबाव आणत होते, ज्यामुळे त्यांना तीव्र मानसिक त्रास होत होता.
advertisement
व्हॉट्सअॅपवर पाठवली 'सुसाईड नोट'
हा त्रास असह्य झाल्याने चंद्रशेखर दवे यांनी वेगवेगळ्या गोळ्यांचे अतिसेवन करून स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांना मेहुणा योगेश रावल, योगेश याची पत्नी जवनिका आणि परिचयातील महिला अंकिता या सतत त्रास देत होत्या. यांच्या जाचाला कंटाळूनच जीवन संपवत असल्याचे दवे यांनी चिठ्ठीत स्पष्ट केले आहे.
या गंभीर घटनेनंतर दवे यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी योगेश रावल, जवनिका आणि अंकिता या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोरिवली पोलीस करत आहेत. व्यावसायिक वाद आणि कौटुंबिक तणावातून घडलेल्या या घटनेने बोरिवलीतील व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
