आता या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जखमी बिल्डर आणि त्यांचा एक सहकारी ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहेत. दोघंही बाहेर आल्यानंतर चारचाकी कारच्या दिशेनं जात आहेत. दरम्यान, आधीपासूनच एकजण कारजवळ दबा धरून बसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या डोक्यावर हेल्मेट देखील आहे.
बिल्डर फ्रेडी आणि त्यांचा सहकारी कारजवळ जाताच हल्लेखोराने समोरून फ्रेडी यांच्या दिशेनं दोन राऊंड फायर केले. हा गोळीबार झाल्यानंतर फ्रेडी जमीनीवर कोसळले. यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच हल्लेखोराचा पाठलाग करायचाही प्रयत्न केला. यामुळे घाबरलेल्या हल्लेखोराने तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली चारकोप परिसरातील बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून फ्रेडी दिलीमा भाई या विकासावर गोळीबार करण्यात आला. फ्रेडीभाई हा तरुण बांधकाम विकासक आहे. हा फ्रेडीभाई कारच्या दिशेनं जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी, अज्ञातांनी दोन ते तीन राउंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेत जखमी झालेला बांधकाम व्यावसायिक फ्रेंडी दिलीमा याला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
