नेमकं घडलं काय?
कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील शमंतकुमार शडक शरप्पा करडेर (वय 31) हे व्यावसायिक आहेत. 15 डिसेंबर 2025 रोजी अंकित नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून आपल्या कंपनीत मोठी गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. चर्चेसाठी मिरा रोडमधील काशिमीरा येथे येण्यास सांगण्यात आले. गुंतवणुकीच्या आशेने शमंतकुमार मिरा रोडला आले.
काशिमीरा येथे पोहोचल्यानंतर आरोपी अंकित आणि त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना आधी ए.आर. पॅराडाईज हॉटेल आणि नंतर आर.के. प्रीमियम हॉटेलमध्ये नेले. मात्र 15 ते 18 डिसेंबरदरम्यान त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. या काळात आरोपींनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून शमंतकुमार यांच्याकडून नेट बँकिंगची माहिती मिळवली.
advertisement
आरोपींचा शोध सुरु
जीवाला धोका असल्याने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बँकेच्या करंट अकाउंटची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 2 कोटी 17 लाख 63 हजार 287 रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. या घटनेनंतर पीडित व्यावसायिकाने 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
