14 वर्षाची अविरत सेवा, पुण्यातील असंही हॉस्पिटल, मुलीचा जन्म झाल्यास घेतला जात नाही एकही रुपया

Last Updated:

पुण्यातील हडपसर भागातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास एक रुपयाही फी घेतली जात नाही.

+
News18

News18

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास एक रुपयाही फी घेतली जात नाही. याठिकाणी मुलीची प्रसूती पूर्णपणे मोफत केली जाते. हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. गणेश राख हे गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सातत्याने काम करत आहेत. या अनोख्या सेवेला 3 जानेवारीला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या या समाजोपयोगी कार्याला 14 वर्ष पूर्ण झाल्याने विविध स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
14 वर्षांची अविरत सेवा...
मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असलेले डॉ. गणेश राख यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होता. अनेक ठिकाणी मुलगी असल्याचे समजताच गर्भपात केल्याच्या घटना समोर येत होत्या. हॉस्पिटल सुरू केल्यानंतर त्यांना अनेक अनुभव आले. मुलगा जन्माला आला तर कुटुंबात आनंद साजरा केला जायचा आणि खुशीने बिलही दिले जायचे. मात्र मुलगी झाली तर आई आणि बाळाला भेटायलाही कुटुंबातील कोणी येत नसायचे. बिल देण्यासाठीही टाळाटाळ केली जायची. यातूनच त्यांच्या मनात एक कल्पना आली. कुटुंब जर मुलीच्या जन्माचे स्वागत करत नसेल, तर हॉस्पिटलच्या वतीने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करायचे आणि एक रुपयाही फी घ्यायची नाही.
advertisement
मुलगी जन्माला आली की हॉस्पिटलमध्ये जंगी सेलिब्रेशन
डॉ. गणेश राख यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्याच दिवशी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी एकत्र येत मोठे सेलिब्रेशन करतात. मुलीच्या संपूर्ण कुटुंबियांचा छोटा सत्कार केला जातो. हॉस्पिटल देखील सजवण्यात येतं. कर्मचारी आणि मुलीचं कुटुंबीय मिळून केक कापण्यात येतो. त्यांच्या या कार्याविषयी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
14 वर्षाची अविरत सेवा, पुण्यातील असंही हॉस्पिटल, मुलीचा जन्म झाल्यास घेतला जात नाही एकही रुपया
Next Article
advertisement
Gold Price: ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
ज्याची भीती होती तेच झालं, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा उलटफेर, बाजारात खळबळ
  • सोन्याच्या दराने मागील काही दिवसांत चांगलीच उसळण घेतली होती.

  • काही दिवसांपूर्वीच सोन्याच्या दराने रेकॉर्ड ब्रेक दर गाठला होता.

  • सोन्याचे दर घसरतील असा होरा होता. मात्र, सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला.

View All
advertisement