सिलिंडरच्या बुकिंगमध्ये वाढ
गॅस कंपनीने 25 दिवसांमध्ये एकदाच सिलिंडरची बुकिंग घेणार या निर्णयामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. महिन्यातून एकदाच सिलिंडरचा पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक गॅस आणि घरगुती गॅस सिलिंडर महिन्यातून एकदाच देणार अशा सूचना दिलेल्या आहेत. खरंतर, घरगुती गॅस सिलिंडर एकाचवेळी दोन वापरण्याची परवानगी आहे. त्यासाठी पहिला सिलिंडर घेतल्यानंतर त्याच्या 15 दिवसांनी दुसऱ्या सिलिंडरसाठी अर्ज करता येत होता. पण सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
advertisement
सरकारकडे गॅसचा तुटवडा?
अद्याप केंद्र सरकारकडून गॅसच्या तुटवड्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु आता केंद्र सरकारने घेतलेल्या गॅस सिलिंडरच्या 25 दिवसांच्या बुकिंगच्या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये सरकारकडे गॅसचा तुटवडा असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. सध्या सरकारने गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबद्दल निर्णय जाहीर केलेला नसला तरीही अनेक नागरिकांकडून पुर्वतयारी केली जात आहे. जुन्या ऑर्डरच अजूनही ग्राहकांना मिळालेल्या नाही, त्यामुळे काही ठिकाणी शक्य असलेले ग्राहक त्यांच्या दुचाकीवर किंवा रिक्षामधून घेऊन जाताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याचा पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी गॅसचा वापर केला जातो, त्या ठिकाणी राखीव गॅस ठेवण्याची माहितीही देण्यात आली आहे.
