'मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, तसंच ओबीसींचं आरक्षण कमी करू नका अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. रविवारच्या ओबीसी एल्गार सभेतून केली होती. याच मुद्द्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भुजबळांची पाठराखण केली आहे.
'भुजबळांची जी भूमिका आहे, तीच सरकारची भूमिका आहे. भुजबळांसोबत माझी चर्चा झाली असल्याचही ते म्हणालेत. तसेच आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही आणि ओबीसींसोबत कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
advertisement
दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्या बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते तर प्रवीण तरडे हे दिग्दर्शक होते. त्यावेळी काही सीन बदलण्यात आले होते. मात्र, यावेळी असं काही होणार नाही, असा विश्वास खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धर्मवीर 2 चा शुभमुहूर्त ठाण्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
'तुमचा समाज पुढे आहे, म्हणून आमच्यावर बुलडोजर चालवू नका. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या पण आमच्यावर बुलडोझर चालवू नका. शिंदे समिती निर्माण केली ती रद्द करा. यांना अधिकार नाही. दोन महिन्यांत कुणबी नोंदीनुसार दिलेल्या प्रमाणपत्रांना स्थगिती द्या. केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करू नका. इतर समाजाचेही करा. त्यानुसार कसे कळेल, कोण पुढे आणि कोण मागे. मंडल आयोगाने सांगितले आम्ही 54 टक्के आहोत. सगळे म्हणतात जनगणना करा, मग करा ना. होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का नाही? जे होईल ते आम्हाला मान्य आहे. आम्हाला लढायचे आहे, दूरपर्यंत लढायचे आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
