dharmveer 2 : 'कोणाला आवडो न आवडो, धर्मवीरच्या दुसऱ्या भागात मी..' प्रदर्शनाआधीच शिंदेंकडून ट्रेलर, म्हणाले..

Last Updated:

dharmveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज धर्मवारी पार्ट 2 चित्रपटाचा शुभारंभ पार पडला. यावेळी या चित्रपटात काय असणार यावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं.

धर्मवीर 2
धर्मवीर 2
ठाणे, 27 नोव्हेंबर (अजित मांढरे, प्रतिनिधी) : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर 2 या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्या बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मराठी अभिनेते व दिग्दर्शक मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते तर प्रवीण तरडे हे दिग्दर्शक होते. त्यावेळी काही सीन बदलण्यात आले होते. मात्र, यावेळी असं काही होणार नाही, असा विश्वास खुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धर्मवीर 2 चा शुभमुहूर्त ठाण्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
चित्रपटाच्या नावात बदल..
मुख्यमंत्री म्हणाले, की धर्मवीर मुक्काम पोस्ट हिंदूस्तान असं आहे. कारण, त्यांचे संपुर्ण देशभर भ्रमण होते. विविध क्षेत्रातील पंथातील धर्मातील लोकं त्यांच्या सोबत होते. त्यांची कार्यपद्धती जगणं वागणं बोलणं वेगळं होतं. हे जगभरातील लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्या बद्दल सर्व टीमचे धन्यवाद. किती कार्यकर्त्यांना सर्व समाजाला जाती पंथांना धर्मातील लोकांना त्यांनी लळा लावला होता. साहेब प्रत्येकामध्ये होते. हिंदूत्वाची साथ घेवून आम्ही हे सरकार स्थापन केले. देशभक्त आणि राष्ट्रभक्त बाळासाहेबांना आणि दिघे सांहेबांना जवळचे होते. ते कधी जात पात पहायचे नाही जो अडचणीत आहे त्याला ते मदत करायचे. याबद्दल मी काही स्पष्टपणे बोलू शकत नाही.
advertisement
कोणतीही सत्ता नसताना त्यांनी जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे काम एका सिनेमात मावरणच नाही. कारण त्यांचे कार्य एवढे प्रचंड आहे की ते किती भागात दाखवता येईल हे मला तरी सांगता येणार नाही. सत्ता संपत्ती अधिकारांचा वापर जनतेसाठी केला पाहिजे दिघे साहेब हे करायचे. त्यांच्याकडे अमार्याद सत्ता होती. त्यांचा शब्द खाली टाकला जायचा नाही, याचे साक्षीदार आम्ही आहोत. पहिला भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि दुस-या भागात मी मुख्यमंत्री आहे. आम्ही गेल्या वर्षभरात जे निर्णय घेतले ते सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मी परवा गडचिरोलीत गेलो होतो. गडचिरोलीत टाटा इन्स्टिट्युटने मोठं ट्रेनिंग सेंटर उभारलं आहे. तिथून नोकऱ्या मिळणार आणि उद्योगपती तयार होणार आहेत.
advertisement
आता जे आहे तेच दाखवणार : मुख्यमंत्री
काही लोकं बोलायचे मंदिर नही बनाएंगे तारीख भी नही बताएंगे आता मोदींनी मंदिर बनवले आणि तारीख पण दिली 22 जानेवारी तारीख दिली. सिनेमा येतात जातात, पण अभिनय लक्षात राहतो ते प्रसाद ओकने केलंय. मराठी सिनेमा गुजरात राजस्थानमध्ये बघितला गेला आणि तो हिंदी बनवा अशी मागणी मोठ्या प्रमाणात झाली. पार्ट 2 हा हिंदीत येईल. काहींना सिनेमा खटकला काही लोकं सिनेमा बघता बघता उठून गेले. काही लोकांना काही सीन आवडले नाही. आता कोणाला आवडो न आवडो आता फुल अथोरीटी आपण आहोत. तेव्हा काही गोष्टी इच्छेविरुद्ध कराव्या लागल्या. कलाकारांना सांगावं लागलं काहींना अजीर्ण झालंय. म्हणुन 1 वर्षांपूर्वी मोठी गोळी दिली. मी डॅाक्टर नाही पण मी ॲापरेशन पण केले. कधी कुठे गोळी द्यायची हे दिघे साहेबांनी शिकवलं आहे. काहींनी विचारले होते दिघे साहेबांची संपत्ती कुठे कुठे आहे ते या सेकंड पार्टमध्ये घेतलंय. त्यांचे उर्वरित काम या सिनेमातून येईल. पोलिसांवर फार प्रेम होते दिघे साहेबांचे, त्यांच्या मुलांचे एडमिशन त्यांच्या अडचणी दिघे साहेब जातीने सोडवायचे. दुसऱ्या पार्टमध्ये जे आहे ती वस्तुस्थितीला धरुन आहे. ज्यांनी हिंदूत्वाशी गद्दारी केली, सत्तेसाठी खुर्चीसाठी 2019 मध्ये झाले जे देशाने पाहिले. पार्ट 2 मध्ये साहेबांच्या हिंदूत्वाची गोष्ट म्हणजे दिघे साहेब आणि बाळासाहेबांचे हिंदूत्वाचे विचार असतील. भुमिका हिंदूत्वाची असली तरी त्यांची त्यात राष्ट्रभक्ती होती, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
dharmveer 2 : 'कोणाला आवडो न आवडो, धर्मवीरच्या दुसऱ्या भागात मी..' प्रदर्शनाआधीच शिंदेंकडून ट्रेलर, म्हणाले..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement