कोल्डप्ले हा सर्वांत यशस्वी आणि प्रसिद्ध बँडपैकी एक आहे. आतापर्यंत त्यांना 300 पेक्षा जास्त अवॉर्ड्स मिळाली आहेत. बँडची लोकप्रियता इतकी आहे की काही वेळातच कॉन्सर्टची तिकिटं विकली गेली आहेत.
या बँडचे जगभरात सुमारे 10 कोटी अल्बम विकले गेले आहेत. पाच सदस्यांच्या या बँडमध्ये मुख्य गायक क्रिस मार्टिन, गिटारिस्ट जॉनी बकलँड, बेसिस्ट गाय बेरीमॅन आणि ड्रमर विल चॅम्पियन यांचा समावेश आहे. पाचवा सदस्य आहे फिल हार्वे, जो ग्रुपचा मॅनेजरही आहे. या सदस्यांची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती जाणून घेऊ या.
advertisement
फिल हार्वे
कोल्डप्ले बँडचा मॅनेजर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर फिल हार्वेबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ. फिल हा बँडचा अदृश्य सदस्य आहे असं म्हणतात. क्लायंट अर्थच्या रिपोर्टनुसार, फिल 90 च्या दशकापासून कोल्डप्लेबरोबर आहे. पण तो इतर सदस्यांप्रमाणे स्टेजवर सादरीकरण करत नाही. चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार फिलची संपत्ती सुमारे 50 मिलियन डॉलर म्हणजे 400 कोटी रुपयांहून अधिक आहे.
विल चॅम्पियन
कोल्डप्लेमध्ये ड्रमर आहे साउथम्पटनचा रहिवासी असलेला विल चॅम्पियन. विल आणि बँडमध्ये इतर सदस्य युनिवर्सिटी कॉलेज लंडनमध्ये पहिल्यांदा भेटले होते. विल जरी या बँडचा सुप्रसिद्ध चेहरा म्हणून श्रोत्यांना परिचित असला तरीही ‘गेम ऑफ थ्रोन्ज’ या विख्यात चित्रपटातही प्रेक्षकांनी त्याचा अभिनय पाहिला आहे. या चित्रपटात त्याने रेड वेडिंगमधील म्युझिशियनचा रोल केला होता. विलची एकूण संपत्ती सुमारे 100 मिलियन डॉलर म्हणजे 800 कोटी रुपयांहून अधिक आहे.
जॉनी बकलँड
कोल्डप्ले हा बँड सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका जॉनी बकलँडने बजावली आहे. एका मुलाखतीत बँडचा प्रमुख गायक क्रिसने सांगितलं होतं की जेंव्हा त्यानी जॉनीचं गिटारवादन ऐकलं तेंव्हा त्याला हे लक्षात आलं की तो ज्या वादकाच्या शोधात आहे तो वादक जॉनी आहे. क्रिस आणि जॉनी यांनी या बँडची सुरुवात केली आहे. जॉनीची एकूण संपत्ती सुमारे 100 मिलियन डॉलर म्हणजे कोटी रुपयांहून अधिक आहे.
गाय बेरिमॅन
गाय बेरीमॅन बँडमधील बेसिस्ट आहे, गाय इंजिनीअर आणि आर्किटेक्ट आहे. गायने काही दिवसांपूर्वीच अॅमस्टरडॅममध्ये त्याचं ‘अप्लाईड आर्ट फॉर्म्स’ हे मेन फॅशन लेबल लाँच केलं आहे. गाय सुमारे 100 मिलियन डॉलर म्हणजे कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचा मालक आहे.
क्रिस मार्टिन
कोल्डप्लेचा प्रमुख गायक क्रिस मार्टिन बँडमधील सर्वांत श्रीमंत सदस्य आहे. क्रिसनी जॉनीबरोबर हा ग्रुप सुरू केला होता, ज्याला त्यांनी ‘पॅक्टोराल्ज’ हे नाव दिलं होतं. क्रिस हा शो बीझ मधला सर्वांत लाडका मेंबर आहे. क्रिसची एकूण संपत्ती सुमारे 160 मिलियन डॉलर म्हणजे कोटी रुपयांहून अधिक आहे.
कोल्डप्लेची सुरूवात 1996 मध्ये क्रिस आणि जॉनी यांनी केली होती. 1996 मध्ये ते दोघं कॉलेजात भेटले. दोघांना परस्परांची पॅशन कळाल्यावर ते एकत्र कार्यक्रम करायला लागले. त्या काळात दोघं ‘बिग फॅट नॉइसेस’ आणि ‘पँक्टोराल्ज’ या नावांनी कार्यक्रम करायचे. हळूहळू ग्रुपमध्ये सदस्य वाढत गेले आणि त्यांच्या सगळ्यांच्या कष्टाने त्यांना प्रचंड लोकप्रियताही मिळू लागली. ‘शिवर’ हे कोल्डप्लेचं पहिलं गाजलेलं गाणं होतं. मुख्य म्हणजे या बँडमुळे सगळ्यांना केवळ लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यांनी प्रचंड संपत्तीही कमवली आहे.
