TRENDING:

मुंबईत महायुतीत संघर्ष पेटला, भाजप पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

Last Updated:

शिवसेनेचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका गटावर गद्दारीचा आरोप केलाय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीधर्म पाळला नाही, असा आरोप समाधान सरवणकरांनी केलाय. तर सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा दावा भाजपनं केलाय. प्रभादेवी प्रमाणेच प्रतीक्षानगरमध्येही महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
News18
News18
advertisement

महायुतीत पडलेली वादाची ठिणगी आता वणव्याचं रूप घेताना दिसतेय. प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा पराभवाचा झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पराभव केल्याचा आरोप आरोप समाधान सरवणकर यांनी केला. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका गटावर गद्दारीचा आरोप केलाय. प्रिया सरवणकर-गुरव यांच्याही विरोधात भाजपच्या एका गटानं काम केल्याचा दावा वाडेकर यांनी केला. तसेच त्यांनी काही व्हॉट्सअप चॅट्सही फेसबुकवर पोस्ट केले.

advertisement

समाधान सरवणकरांच्या वक्तव्याची भाजपने घेतली दखल

समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपांची भाजपनं गंभीर दखल घेतली. जाहीर वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला. मात्र सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याचा दावा करत सायबर सेलकडे तक्रार करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला. तसंच भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी काही रोखठोक मुद्दे मांडले. वॉर्ड क्रमांक191 मध्ये प्रिया सरवणकर-गुरव यांना भाजपची सगळी मतं पडली. विशाखा राऊत यांच्याकडे ही मतं वळली नाहीत. आगरबाजारच्या पुढे त्यांना शिवसेनेची मतं पडली नाहीत. भाजपवर खापर फोडू नका. समाधान सरवणकरांनी आकडेवारीचा अभ्यास करावा, असा टोला अक्षता तेंडुलकर यांनी लगावला.

advertisement

कुठे कुठे संघर्ष? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
माघी गणेश जयंतीला भाग्य उजळणार, 6 राशींवर बाप्पाची कृपा होणार!
सर्व पहा

महायुतीत प्रभादेवीमध्ये जसा संघर्ष शिगेला पोहोचलाय, तसाच वाद प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्येही पेटलाय. महायुतीतील शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं कमळाचा प्रचार केला. बंडखोरांवर कारवाई केली नाही, असा आरोप माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी केलाय. केळुसकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे या वॉर्डात महायुतीत तणाव निर्माण झालाय. एकंदरीतच प्रतीक्षानगर, प्रभादेवीमधील ही नाराजी महायुतीला तडा देणारी आहेत. त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत महायुतीत संघर्ष पेटला, भाजप पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल