TRENDING:

Shocking : बोरिवली हादरली, पती-पत्नीचे एकत्र मिळून धक्कादायक कांड; दुसऱ्याच्या सुखी संसाराचा केला अंत

Last Updated:

Mumbai Crime News : मुंबईतील बोरिवलीतून पती-पत्नीने केलेल्या एका गुन्ह्याची आता सर्वत्र चर्चा होत असून सध्या या प्रकरणी पोलिस तपास सुरु झालेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईच्या बोरीवलीमध्ये पती-पत्नीने केलेल्या कांडने सर्वजण हादरले आहेत. सध्या या दोघांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरु आहे.
Mumbai husband wife property scam news
Mumbai husband wife property scam news
advertisement

स्वतःच्या फायद्यासाठी पती-पत्नीचे भयानक कांड

मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली परिसरात फ्लॅट खरेदीच्या नावाखाली सुमारे 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश केशव रहाटे आणि सविता गणेश रहाटे या पती-पत्नीविरुद्ध बोरिवली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मेहुणी आणि साडू यांनी न्यू एमएचबी कॉलनीतील एका सोसायटीमध्ये आरोपींकडून एक फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅट आणि मेंटेनन्ससाठी त्यांनी सुमारे 60 लाख रुपये आरोपींना दिले होते.

advertisement

या गोष्टीने संशय बळावला

मात्र पूर्ण पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे संशय आल्याने तक्रारदारांनी सोसायटीमध्ये चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. गणेश रहाटे यांनी संबंधित फ्लॅटवर एका खासगी बँकेतून 35 लाखांचे गृहकर्ज घेतले होते. विशेष म्हणजे तो फ्लॅट त्यांच्या मालकीचा नव्हता तर ते दोघेही त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata आता करणार मार्केट जाम, आणली 468 किमी मायलेजदार SUV; किंमतही 6 लाखांपासून
सर्व पहा

हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडितांनी दिंडोशी सत्र न्यायालय येथे याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. तसेच बोरिवली पोलिसांकडेही अधिकृत तक्रार देण्यात आली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : बोरिवली हादरली, पती-पत्नीचे एकत्र मिळून धक्कादायक कांड; दुसऱ्याच्या सुखी संसाराचा केला अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल