TRENDING:

सिलेंडरची टंचाई, गुन्हेगारांचा सुकाळ; MGL चे ग्राहक टार्गेटवर; कशा घ्यायची खबरदारी?

Last Updated:

महानगर गॅसचं बिल अपडेट नाही, कनेक्शन बंद होईल, असा मेसेज आल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत सिलेंडर टंचाईतच नागरिकांसमोर अजून एक संकट निर्माण झालाय. महानगर गॅसच्या ग्राहकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सापळा टाकलाय. महानगर गॅस लिमिटेडच्या नावानं ग्राहकांना फोन, एसएमएस आणि बोगस लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. मागील चार दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा चार घटना समोर आल्या आहेत.
News18
News18
advertisement

मुंबईत गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर आता सायबर भामट्यांनी नवी मोडस ऑपरेंडी वापरायला सुरुवात केली आहे. महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने ग्राहकांना फसवलं जात आहे. डोंबिवलीतील एका महिलेला अशाच प्रकारे फसवण्यात आले. महानगर गॅसचं बिल अपडेट नाही, कनेक्शन बंद होईल, असा मेसेज आल्याने त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांची फसवणूक झाली.

advertisement

सायबर भामट्यांची मोडस ऑपरेंडी काय?

सायबर भामटे ग्राहकांना फोन किंवा SMS करतात.गॅस कनेक्शन बंद होईल अशी बतावणी केली जाते. 10-20 रु. ऑनलाईन पेमेंट करण्याची सूचना केली जाते. पेमेंटसाठी बोगस लिंक ग्राहकांना पाठवली जाते. लिंक ओपन करताच मोबाईल हॅक होतो आणि बँक अकाऊंटमधील रोकड लंपास होते.

कुठे कुठे झाली फसवणूक? 

advertisement

डोंबिवलीच नव्हे तर मुंबईतील विले पार्ले, पार्क साइड, वडाळा आणि बोरिवली या भागांमध्येही अशाच प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. चार घटनांमध्ये तब्बल 26 लाखांना गंडा घालण्यात आला. सायबर भामटे वृद्धांना लक्ष्य करत असल्याचं तपासात उघड झालंय. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरलाही अशाच प्रकारे गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सायबर फ्रॉड असल्याचं लक्षात आल्यानंतर सिद्धार्थनं त्या भामट्याचीच फिरकी घेतली होती.

advertisement

फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी काय खबरदारी घ्यावी?

कनेक्शनबाबत थेट गॅस कंपनीशी संपर्क साधा. मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी शेअर करू नका. पासवर्ड शेअर करू नका. CVV नंबर शेअर करू नका.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

जागतिक स्तरावर गॅस पुरवठा कमी होण्याच्या चर्चांमुळे नागरिक आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत या भीतीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी या संकटातही फसवणुकीला सुरूवात केलीय. त्यामुळे ग्राहकांनी अधिक सतर्क राहून आपली फसवणूक टाळणं गरजेचं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
सिलेंडरची टंचाई, गुन्हेगारांचा सुकाळ; MGL चे ग्राहक टार्गेटवर; कशा घ्यायची खबरदारी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल