TRENDING:

Dadar–Ratnagiri Express : कोकणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसच्या प्रवासात आता 'हा' बदल

Last Updated:

Dadar- Ratnagiri Express: दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसचा मार्ग गोरखपूरकडे वळवल्याने कोकणातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे प्रवासाचे नियोजन विस्कळीत झाले असून पर्यायी सोयींची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जर तुम्हीही दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येत्या काही दिवसांपासून या एक्स्प्रेमध्ये मोठा बदल झालेला आहे.
दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसच्या मार्गात बदल झाल्यानंतर दादर स्थानकावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, कोकणातील प्रवासाचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसच्या मार्गात बदल झाल्यानंतर दादर स्थानकावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, कोकणातील प्रवासाचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
advertisement

नेमकं घडलं काय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच दादर येथून रत्नागिरी- सावंतवाडीपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या आधीच कमी आहेत, अशातच काही असलेल्या गाड्यांचे थांबे मुंबईतील काही थांबे बदलले जात आहेत, अशाने प्रवाशांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एवढंच नाही तर उत्तर भारतात ज्या गाड्या जातात त्यांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना कोकणवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.

advertisement

त्यात दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसबाबतही असाच एक निर्णय घेण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेने परिचालनातील अडचणींचे कारण देत ही गाडी आता दादरऐवजी दिवा स्थानकातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दादरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.

दरम्यान रेल्वे मंत्रालयाने दादर ते गोरखपूर विशेष एक्स्प्रेस कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी गेल्या 2 वर्षांपासून विशेष गाडी म्हणून धावत होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय जाहीर केला असून भाजप नेते रवी किशन यांनी यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.

advertisement

या सर्व घेतलेल्या निर्णयांमुळे कोकण प्रवाशांमध्ये नाराजी वाढलेली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत ही चूक तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, उपनगरी लोकल गाड्यांमुळे दादर-रत्नागिरी गाडी चालवताना अडचणी येतात. कोकणाकडून येणारी गाडी दिवा स्थानकात येताना किंवा तिथून बाहेर पडताना मुख्य मार्गावर आणण्यासाठी काही वेळ उपनगरी गाड्या थांबवाव्या लागतात. त्यामुळे वेळापत्रकावर परिणाम होतो असे रेल्वेने सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Dadar–Ratnagiri Express : कोकणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! दादर-रत्नागिरी एक्स्प्रेसच्या प्रवासात आता 'हा' बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल