कुठून-कुठे जोडणार नवा मार्ग?
या प्रकल्पाचा मार्ग मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पाशी जोडलेला आहे.लिंक रोड हा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवटचा भाग आहे. हा प्रकल्प सहा पॅकेजमध्ये विभागलेला असून, ‘F’ पॅकेज गोराईला दहिसरशी जोडेल. दहिसरमध्ये हा एलिव्हेटेड रोड कांदरपाडा मेट्रो स्थानकाजवळ सुरू होईल आणि भाईंदर पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस गार्डनवर संपेल. मार्ग संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रातून जात असल्यामुळे त्याचे पर्यावरणीय महत्त्व आहे.
advertisement
सध्या दहिसर ते भाईंदर 10 किमीचा प्रवास अनेकदा 50 ते 60 मिनिटांचा होतो कारण काशिमिरा आणि दहिसर चेक नाक्यावर वाहतूक कोंडी असते. लिंक रोडचा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना ही कोंडी टाळता येईल आणि प्रवास फक्त 5 मिनिटांत होईल.
या नवीन रोडची लांबी 4.58 किमी आहे असून तर इंटरचेंज आणि रॅम्पची लांबी 3.64 किमी असेल. हा 45 मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड असेल, ज्यामुळे वाहतुकीची क्षमता वाढेल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे 3.5 वर्ष लागतील म्हणजेच हा मार्ग 2029 पर्यंत वापरासाठी सुरु होऊ शकतो.
