या उपक्रमामागील प्रमुख हेतू म्हणजे दिवाळीचा सण त्या मुलांसाठी खास बनवणे ज्यांना कुटुंबाची उब लाभलेली नाही. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करताना समाजातील इतर नागरिक त्यांच्यासाठी एक कुटुंब बनतात आणि त्यांना प्रेम, जिव्हाळा आणि स्नेह देतात.
advertisement
यावर्षी 'We Change' या संस्थेसोबत 'जीवन संवर्धन फाउंडेशन' आणि इतर काही स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या. 'जीवन संवर्धन फाउंडेशन' गेली 15 वर्षे अनाथ आणि बेघर मुलांसाठी शिक्षण, निवारा आणि इतर मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “वृंदावन आणि We Change यांच्यासोबत सहभागी होऊन आमच्या मुलांना डान्ससारख्या सादरीकरणाचे व्यासपीठ मिळाले आणि आमची दिवाळी अविस्मरणीय झाली. आम्ही आयोजकांचे मनापासून आभार मानतो.”
या कार्यक्रमात खाद्यपदार्थांपासून ते विविध हस्तनिर्मित वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे या वस्तू अनाथ मुलांनी स्वतः तयार केलेल्या होत्या ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही वाढीस लागले.
अमित जयस्वाल म्हणाले, “अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यामागे एकच भावना असते त्यांच्यासाठी आपणच कुटुंब आहोत हे त्यांना जाणवावे. ही अनुभूती खूप खास असते.” 'We Change' संस्थेनेही आयोजकांचे आभार मानले आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याला “एक अनमोल संधी” असे म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी पुढील वर्षी नवीन संस्था सहभागी व्हाव्यात असे आवाहन केले आणि सर्वांनी पुढे येऊन समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.