डोंबिवलीच्या सागांव परिसरात एक शाळा आहे. या शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर आहेत. या ट्रस्टीचा मुलगा सरवना याने अश्लील मेसेज करून शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप शाळेतील शिक्षिकेने केला आहे. खरं तर पिडीत शिक्षिका ही वर्षभरापूर्वीच या शाळेत शिकवणीसाठी रूजू झाली होती. त्यानंतर तिला सरवना हा अश्लील व्हिडिओ पाठवून त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करायचा.या गोष्टी शिक्षिकेने नकार देऊन ही तो सतत तिला अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवायचा.
advertisement
दरम्यानच्या काळात सहावीतल्या एका मुलीने देखील तक्रार केली होती.त्यांना कम्प्युटर लॅबमध्ये सुरक्षित वाटायचे नाही. कारण सरवना हा शाळेत मुलांना कम्प्युटर शिकवायचा.या घटनेनंतर अखेर या प्रकरणी शिक्षिकेसह तिच्या आईने मनसेकडे तक्रार केली.हा प्रकार कळताच मनसेचे पदाधिकारी राहूल कामत,अरुण जांभळे आणि कोमल पाटील यांनी थेट शाळेत धाव घेतली होताी.
यावेळी शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी मनसेने मुलाला कुठे लवपून ठेवला आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा मनसे स्टाईलने त्याला शिक्षा देऊ अशी जोरदार मागणी केली. जवळपास एक तास शाळत मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला.अखेरी हा प्रकार कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी स्वत: मनसे पदाधिकाऱ्यांना शाळेतून बाहेर काढत ट्रस्टी शिवा यांच्याकडे त्यांच्या मुलाविषयी विचारणा केली. त्यावेळी शिवा यांनी पोलिसांना शाळेच्या शेजारी असलेल्या त्यांच्या घरी नेले. पोलिसांनी शिवा यांच्या घरातून त्यांचा मुलगा सरवना याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
पिडीत शिक्षिका काय म्हणाली?
माझ्या मुलाकडून काही चुक झाली हे मला काल रात्री ऑफीसमधून आल्यावर कळलं. मी त्याला सकाळी विचारल्यावर त्याने घाणेरडे फोटो पाठवल्याची कबुली दिली. आणि तिच्याकडून काहीतरी घाणेरडे फोटो आले आहेत.त्यामुळे असं समजलं की दोघांकडून काहीतरी चुक झाली.त्यानंतर मी माझ्या वकिलाशी बोललं, तिथपर्यंत मनसेचे पदाधिकारी आले आणि ते माझ्या ऑफिसमध्ये दमदाटी करत होते. दरम्यान माझ्या मुलाला पोलिस घेऊन गेले आहेत.जर माझ्या मुलावर जो गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तो दोषी असल्यास त्याला शिक्षा द्यावी, असे शाळेचे ट्रस्टी शिवा अय्यर यांनी सांगितले आहे.
मी एक वर्षापासून या शाळेत शिकवते आहे.सप्टेंबरपासून माझ्यासोबत हा छळ सूरू झाला.पहिल्यांदा मला शाळेच्या नंबरवरून व्हॉटसअॅपवर मेसेज आला.त्यावेळेस मला वाटलं माझा नंबर क्लर्कजवळ असतो.त्यामुळे मी रिप्लाय दिला. पण नंतर बोलता बोलता कळाल कि तो प्रिसिंपलच्या मुलगा सरवणा सर होता. जो त्याच शाळेत मुलांना कम्प्युटर शिकवायचा. त्यानंतर सहावीत इयत्तेत शिकत असलेल्या मुलींचीही तक्रार आली होती. त्यांना कम्प्युटर लॅबमध्ये सुरक्षित वाटायचे नाही. त्यानंतर मला त्यांनी त्यांच्या पर्सनल नंबरवरून मेसेज केला आणि काही गोष्टींची त्यांनी मागणी केली,पण त्यांना सरळ नकार दिला.तरी देखील त्याने अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवले,असे पिडीत शिक्षिकेने सांगितले आहे.
