कोणत्या शहरांना जोडणार
नायगाव खाडीवर दुमजली नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण मिरा-भाईंदरहून वसई-विरारला रस्त्याने जाण्यासाठी सध्या मोठा वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे सुमारे 45 ते 60 मिनिटे वेळ लागतो. मात्र या होणाऱ्या पूलामुळे येत्या काही वर्षांत हा प्रवास खूपच सोपा आणि जलद होणार आहे.
कसा असेल हा पूल?
advertisement
एमएमआरडीएच्या बैठकीत मेट्रो 13 म्हणजे (मिरा-भाईंदर ते वसई-विरार) मार्गिकेअंतर्गत 4.98 किमी लांबीच्या दुमजली खाडी पुलाला मंजुरी देण्यात आली. या पुलाच्या वरच्या स्तरावरून मेट्रो धावेल तर खालच्या स्तरावरून वाहनांची वाहतूक होईल. आता या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुढील कामकाज सुरू होईल.
सध्या सुरू असलेल्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अभ्यासानुसार हा दुमजली पूल बांधणे शक्य आणि उपयोगी असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे एमएमआरडीएने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
मेट्रो 9चा विस्तार वसई-विरारपर्यंत?
दहिसर ते मिरा-भाईंदर या मेट्रो 9 मार्गिकेचा विस्तार मेट्रो 13 द्वारे वसई-विरारपर्यंत करण्यात येणार आहे. नायगाव खाडीवरून जाणाऱ्या या मार्गिकेमुळे दोन्ही भागांतील अंतर कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. भविष्यात या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता आहे.
