TRENDING:

गर्दीचं टेन्शन संपलं! मुंबई-नागपूर प्रवास सोपा होणार, दुरांतो एक्स्प्रेसबाबत मोठं अपडेट

Last Updated:

Duronto Express : जर तुम्हीही दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करत असताल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या एक्स्प्रेसमध्ये काही बदल करण्यात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून प्रवासाचे नियोजन नव्या रचनेनुसार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याआधी सर्व बदलांची व्यवस्थित माहिती प्रवाशांनी जाणून घ्यावी,अन्यथा प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दुरांतो एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल
दुरांतो एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल
advertisement

'हे' नवे नियम पाहा

मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 12219/12220 अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस आता नवीन डब्यांसह धावणार आहे. एक्स्प्रेसमधील हा बदल 24 एप्रिल 2026 पासून करण्यात येणार असून ट्रेन क्रमांक 12220 सिंकदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस ही गाडी नवीन डब्यांसब सिकंदराबादहून सुटेल.

कसे असतील नवीन बदल?

advertisement

नवीन बदलांनुसार या गाडीत एक प्रथम श्रेणी आणि चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी तर तेरा वातानुकूलित तृतीय श्रणी आणि दोन जनरेटर डबे असणार आहे. घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

प्रवाशांनी या नव्या बदलांची सर्व माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे तिकीच बुक करताना नव्या डब्यांच्या बदलांनुसार सीट किती आहे ते पाहणे आवश्यक ठरेल. खरं तर लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
गर्दीचं टेन्शन संपलं! मुंबई-नागपूर प्रवास सोपा होणार, दुरांतो एक्स्प्रेसबाबत मोठं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल