म्हाडामध्ये नोकरीला असल्याचा दावा करत आणि स्वस्त दरात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत या एजंटाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. मात्र, घर न मिळाल्याने फसवणुकीचा अंदाज आल्यावर त्यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
जालना, छत्रपती संभाजीनगरवर पाणी संकट, पाणीपुरवठा खंडित होणार, कारण काय?
म्हाडा घर देतो म्हणणारा मित्रच ठरला ठग
advertisement
दादरच्या काकासाहेब गाडगीळ मार्गावर राहणाऱ्या विमा एजंटाची विक्रोळीतील विष्णू चिंचावडेकर याच्यासोबत चांगली मैत्री होती. चिंचावडेकरने म्हाडामध्ये काम करत असल्याचे सांगून 30 लाखांत 225 चौरस फुटांचे घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने 15 लाखांची मागणी केली. भवानी शंकर रोडवरील एका इमारतीतील फ्लॅट दाखवून तक्रारदाराचा विश्वास जिंकला. घर आवडल्याने तक्रारदाराने 14 लाख रुपये दिले. मात्र, घर न मिळाल्यामुळे फसवणुकीचा अंदाज आल्यावर त्यांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेत्यांच्या नावाचा गैरवापरही सुरू
फसवणुकीचे हे प्रकार इथेच थांबत नाहीत. काही ठग थेट राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करून लोकांना चुना लावत आहेत. काही नेत्यांचे पीए असल्याचा दावा करून लोकांना विश्वासात घेणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
यापूर्वीही अशा घटना
शिवडी पोलिसांची कारवाई: एमएमआरडीएमध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या विजय मारुती कांबळे (38) या आरोपीला शिवडी पोलिसांनी अटक केली होती. त्याने सामान्य नागरिकांसह पोलिसालाही पावणे 18 लाखांना गंडवले.
पालिकेचा बनावट कर्मचारी: सफाई कामगार असलेला हा आरोपी स्वतःला पालिकेतील मुकादम असल्याचे भासवत नागरिकांची फसवणूक करत होता.
पोलिसांचा इशारा
घर घेण्याच्या व्यवहारांमध्ये कुणाच्याही आमिषाला बळी न पडता सर्व कागदपत्रे नीट पडताळून पाहावीत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. कोणत्याही शासकीय योजनेची खातरजमा न करता मोठी रक्कम देणे टाळावे, अन्यथा अशा ठगांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक असते.