गुजरातचे व्यापारी 17 रोजी हुंदाई क्रेटा कारमधून सुरत येथून मुंबईमध्ये येत होते. त्यावेळी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या मुंबई वाहिनीवरील खानिवडे टोल प्लाझाचे पुढे एका मारुती वॅगन आर कारमधून आलेल्या पाच अनोळखी आरोपींनी क्रेटा कार थांबवली. पोलीस असल्याची बतावणी करुन व्यापाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाला आरोपींनी स्वतःच्या वॅगन आर कारमध्ये बसवले. तसेच कारमध्ये असलेली रोख रक्कम आणि इतर दोघांना हुंदाई क्रेटा कार जबरीने ताब्यामध्ये घेऊन त्यामधील इसमांना मागे पुढे उतरवून पैसे घेवून पसार झाले. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त, अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले. सर्व नेमणुक गुन्हे शाखा कक्ष-३ तसेच सफौ संतोष चव्हाण, सायबर सेल यांनी सापळा रचून मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने संपूर्ण महामार्ग आणि रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपी पर्यंत पोहचले. धारावीचा कुप्रसिद्ध स्वतःला मोठा समाजसेवक म्हणून मिरवणारा मुरगनंदन अभिमन्यु (वय 46), बाबु मोडा स्वामी (वय 48), मनीकंडन चलैया (वय 50), बालाप्रभु शनमुगम (वय 39) ताब्यात घेण्यात आले.
वाचा - घर बांधण्यासाठी 9 वर्षीय मुलाचं अपहरण; मग मागितली 23 लाख खंडणी, शेवटी हत्या
कुंपणाने शेत खाल्ले
धारावीचा मुरगनंदन अभिमन्यु याच्या मित्राने 4 कोटीची रक्कम मुंबईला जात असल्याची माहिती दिली होती. चार कोटी सत्यांशी लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम तर 10 लाख रुपये किमतीची धुंदाई क्रेटा कार, 3 लाख रुपये किमतीची मारुती वॅगन आर कार, २,६५,००० रुपये किमतीचे मोबाईल फोन असे एकूण पाच कोटी तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी मुरगनंदन अभिमन्यु हा धारावीत मी मोठा समाजसेवक असल्याच्या अविर्भावात वावरत असे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.