घर बांधण्यासाठी ठाण्यातील 9 वर्षीय मुलाचं अपहरण; मग मागितली 23 लाख खंडणी, शेवटी हत्या
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मुलगा जिवंत हवा असल्यास 23 लाख रूपये द्या, अशी मागणी करून अपहरणकर्त्यांनी फोन बंद केला. गावकऱ्यांनी रात्रभर इबादचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.
मुंबई ( गणेश गायकवाड, प्रतिनिधी) : बदलापूर जवळील गोरेगांव भागात 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. इबाद बुबेरे असं या मुलाचं नाव होतं. या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 4 तासात सलमान आणि सफूआन या दोघांना अटक केली आहे. तर इतर चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांचा या हत्येत किती सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.
इबाद हा रमजान निमित्त गावातील मस्जिदमध्ये नमाज अदा करून बाहेर पडला होता. त्यावेळीच त्याचं अपहरण करण्यात आलं. मुलगा जिवंत हवा असल्यास 23 लाख रूपये द्या, अशी मागणी करून अपहरणकर्त्यांनी फोन बंद केला. गावकऱ्यांनी रात्रभर इबादचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर ग्रामीण पोलीस आणि क्राइम ब्रांचने घटनास्थळी येऊन तपास केला.
advertisement
पोलिसांनी शोध घेतला असता गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्याच्या घरातच इबादचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. रमजान सणाच्या तोंडावर ही हत्या झाल्याने गावात शोककळा पससली आहे .मात्र या हत्येचं कारण तर अतिशय धक्कादायक आहे. अपहरणामागचं कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं घराचं काम सुरू आहे. त्या घराच्या कामासाठी त्याला पैसे लागणार होते. याच कारणासाठी पैसे मिळवण्याकरता आरोपींनी या मुलाचं अपहरण करून 23 लाख रुपये मागितले असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, मुलाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नक्की ही हत्या पैशाच्या उद्देशाने केली गेली आहे की त्या मागचा आणखी काही उद्देश आहे हे समोर येईल
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 26, 2024 12:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
घर बांधण्यासाठी ठाण्यातील 9 वर्षीय मुलाचं अपहरण; मग मागितली 23 लाख खंडणी, शेवटी हत्या