TRENDING:

Ganpati Special Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या मार्गांवर धावणार 44 गणपती स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Ganpati Special Train: कोकणातील गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने एक खास गिफ्ट दिलं आहे. मध्य रेल्वेकडून कोकणसाठी 44 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: कोकणचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईसह उपनगरांतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यासाठी दरवर्षी रेल्वेकडून विशेष तयारी केली जाते. यंदा देखील मध्य रेल्वेने 250 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. आता त्याशिवाय आणखी 44 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. याबाबत मध्य रेल्वेने नुकतीच घोषणा केली असून गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या मार्गांवर धावणार 44 जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या मार्गांवर धावणार 44 जादा गाड्या, पाहा वेळापत्रक
advertisement

अनारक्षित विशेष गाड्यांचा विस्तार

मध्य रेल्वेकडून दिवा-चिपळून-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येतील. पूर्वी जाहीर केलेल्या 38 अनारक्षित विशेष ट्रेनऐवजी आता 40 अनारक्षित विशेष ट्रेन असणार आहेत. दिवा-चिपळूण-दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेन ही 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या काळात चालवी जाईल. त्यामुळे गणेशोत्सव काळात 296 विशेष ट्रेन गणेशभक्तांच्या सेवेत असणार आहेत.

advertisement

पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!

एलटीटी – सावंतवाडी द्वैसाप्ताहिक विशेष

लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वैसाप्ताहिक विशेष ट्रेनच्या एकूण 8 सेवा चालवण्यात यतील. ही गाडी 28 आणि 31 ऑगस्ट, तसेच 4 आणि 7 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 8.45 वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. या गाडीच्या 4 सेवा चालवण्यात येतील. ही गाडी परतीच्या प्रवासात 28 आणि 31 ऑगस्ट तसेच 4 आणि 7 सप्टेंबर रोजी सावंतवाडीतून रात्री 11.20 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीचे आरक्षण 3 ऑगस्टपासून सुरू होईल.

advertisement

दिवा-खेड-दिवा मेमूच्या सेवा

दिवा – खेड – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्यांच्या 36 सेवा चालवण्यात येणार आहेत. ही मेमू विशेष ट्रेन 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत दिवा येथून दुपारी 1.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता खेडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान खेड येथून रोज सकाळी 8 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 1 वाजता दिवा येथे पोहोचेल.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Ganpati Special Train: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या मार्गांवर धावणार 44 गणपती स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल