यंदा गणपती बाप्पांचे आगमन 27 ऑगस्ट रोजी होत असून त्याआधीच चाकरमानी कोकणात रवाना होतात. विशेष म्हणजे यावर्षी 22 आणि 23 ऑगस्टला चौथा शनिवार व रविवार असल्याने शासकीय सुट्ट्या आहेत. त्यामुळे शुक्रवारीच चाकरमानी गाव गाठण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर 22 ऑगस्टची सर्व नियमित गाड्यांची तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपली. तसेच कोकणकन्या, मांडवी आणि तुतारी एक्स्प्रेससह वंदे भारत आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला देखील प्रचंड वेटिंग लागले आहे.
advertisement
ST Live Location: लालपरीच्या प्रवाशांसाठी खूशखबर, 15 ऑगस्टपासून ST चे लाईव्ह लोकेशन दिसणार
मुंबई महानगरातून दरवर्षी सुमारे 12 ते 13 लाख चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. रेल्वे प्रवास अधिक स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित असल्याने चाकरमान्यांची याच प्रवासाला पसंती असते. परंतु, गणपती स्पेशल गाड्यांची वेळेत घोषणा न झाल्याने अनेकांना नियमित गाड्यांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे जादा गाड्यांची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.
