ST Live Location: लालपरीच्या प्रवाशांसाठी खूशखबर, 15 ऑगस्टपासून ST चे लाईव्ह लोकेशन दिसणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
ST Live Location: राज्यात एसटीच्या 50 हजार मार्गांवर सव्वालाख फेऱ्यांमधून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. आता गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन पाहता येणार आहे.
मुंबई : एसटी बसचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारा मानला जातो. परंतु, काहीवेळा एसटीची वाट पाहात तासनतास ताटकळत राहावे लागते. हाच नाहक त्रास आता कायमचा संपणार आहे. आता 15 ऑगस्टपासून लालपरीचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना कळणार आहे. यासाठी 15 ऑगस्टपासून एसटीच्या ॲपची सुरुवात होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही काळापासून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची चर्चा होती. आता याबाबत एसटी महामंडळाने श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. यामध्ये एसटी तिकीटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस एसटी स्टॅण्डवर येण्याची गाडीची अचूक वेळ देखील समजणार आहे.
advertisement
12 हजार बसमध्ये जीपीएस
राज्यातील एसटी बसमध्ये जीपीएस बसवण्याचे आणि प्रवाशांना बस ट्रॅकरता याव्यात, यासाठी अॅप्लिकेशन तयार करण्याचे कंत्रात कोविड साथीच्या पूर्वीच एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 2019 मध्येच हे अॅप्लिकेशन लाँच केले होते. ते कंपनीला सहा महिन्यात उपलब्ध करून द्यायचे होते. परंतु, अद्याप त्याचे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत 12 हाजर बसेसमध्ये जीपीएस बसवण्यात आले असून उर्वरित बसमध्ये ते बसवण्याचे काम सुरू आहे.
advertisement
गाडी नेमकी कुठे?
राज्यात एसटीच्या 50 हजार मार्गांवर सव्वालाख फेऱ्यांमधून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना बसचे ठिकाण समजत नाही. त्यामुळे तासनतास ताटकळत राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांनी काढलेल्या तिकीटावर असलेला ट्रीप कोड एसटीच्या ॲप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यास बसचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ आणि थांबेदेखील समजतील.
advertisement
दरम्यान, मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात यासाठी अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 8:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ST Live Location: लालपरीच्या प्रवाशांसाठी खूशखबर, 15 ऑगस्टपासून ST चे लाईव्ह लोकेशन दिसणार


