गणेशोत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक
गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून 3 मार्गांवर जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बांद्रा टर्मिनस ते रत्नागिरी, मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मुंबई सेंट्रल ते ठोकूर या गाड्यांचा समावेश असणार आहे.
advertisement
मुंबई सेंट्रल त ठोकूर विशेष रेल्वे
मुंबई सेंट्रल त ठोकूर (गाडी क्र. 09011) ही गाडी दर मंगळवारी धावणार आहे. 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान ही विशेष गाडी सुरू राहील. सकाळी 11.30 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटून ती दुसऱ्या दिवशी सकाळी 8.50 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. तर गुरुवारी सकाळी 11 वाजता ठोकूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.15 वाजता मुंबईत पोहोचेल.
थांबे: बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल पेन, रोहा, मानगाव, वीर, खेड, चिपळून, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमली, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, मुकांबिका रोड बिंदूर, कुंडपुरा, उडपी, मुल्की णि सुरथकल स्टेशन येथे थांबे असणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी ही गाडी आठवड्यातून 4 दिवस बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणार आहे. तर बांद्रा टर्मिनस ते रत्नागिरी ही साप्ताहिक विशेष गाडी दर गुरुवारी धावणार आहे. 21 ऑगस्टपासून ही विशेष रेल्वे सुरू होणार आहे.
दरम्यान, वरील गाड्यांचे आरक्षण 23 जुलै 2025 पासून आरक्षण केंद्रांवर व IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या प्रवासाचं नियोजन या विशेष गाड्यांच्या माध्यमातून करता येणार आहे.
