advertisement

Konkan Railway: 22 तासांचा कोकण प्रवास फक्त 12 तासांत होणार, गणेशोत्सवासाठी रेल्वेची नवी सेवा, तिकीट दर किती?

Last Updated:

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जात असतात. त्यासाठी रेल्वेने नवी सेवा सुरू केली असून आता 22 तासांचा प्रवास फक्त 12 तासात होणार आहे.

Konkan Railway: 22 तासांचा कोकण प्रवास फक्त 12 तासांत, रेल्वेची खास सेवा, तिकीट दर किती?
Konkan Railway: 22 तासांचा कोकण प्रवास फक्त 12 तासांत, रेल्वेची खास सेवा, तिकीट दर किती?
मुंबई: गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी खास नवी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. देशात प्रथमच खासगी चारचाकी गाड्या रेल्वेमार्गे वाहून नेण्याची सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिली असून, ही सेवा 23 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. ही विशेष रेल्वे कोलाड (महाराष्ट्र) येथून सुटून वेरणा (गोवा) येथे पोहोचेल. रस्त्याने साधारणत 22 तास लागणारा हा प्रवास आता रेल्वेने केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. ही सेवा प्रवाशांसाठी वेळेची मोठी बचत करणारी ठरणार आहे.
तिकीट दर किती?
या रेल्वेत प्रत्येक कारसोबत तीन प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा आहे. यामध्ये दोन प्रवाशांना तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यात, तर एका प्रवाशाला शयनयान डब्यात जागा मिळणार आहे. एका कारसाठी एकूण 7,875 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय तृतीय वातानुकूलितसाठी प्रति प्रवासी 935 रुपये आणि शयनयानसाठी 190 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
advertisement
एकावेळी 40 कार नेता येणार
रेल्वे दररोज संध्याकाळी 5 वाजता कोलाडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेरणाला पोहोचेल. मात्र, रेल्वे सुटण्याच्या किमान तीन तास आधी प्रवाशांनी स्टेशनवर पोहोचणे आवश्यक आहे. या सेवेसाठी किमान 16 कार नोंदवल्या गेल्यासच ती फेरी सुरू केली जाईल, अन्यथा ती रद्द करण्यात येणार आहे. या विशेष सेवेसाठी एकूण 20 बोगी असतील. प्रत्येक बोगीत दोन कार वाहून नेण्याची सोय असून, एकावेळी 40 कार नेण्याची क्षमता या रेल्वेगाडीत आहे.
advertisement
दरम्यान, कोकणात गणपती साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी दरवर्षी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे कोकण रेल्वेची ही सुविधा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. आपल्या गाडीसह सुरक्षित, आरामदायक आणि वेळ वाचवणारा प्रवास करण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway: 22 तासांचा कोकण प्रवास फक्त 12 तासांत होणार, गणेशोत्सवासाठी रेल्वेची नवी सेवा, तिकीट दर किती?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement