TRENDING:

गणेशोत्सवाची लगबग!, मार्केटमध्ये आले एकापेक्षा एक आकर्षक मखर, किंमत पाहून तुम्हालाही होईल आश्चर्य, VIDEO

Last Updated:

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस उतरल्यावर एक मिनिटाच्या अंतरावर वनमाळी सभागृह आहे. या सभागृहात वर्षानुवर्ष बाप्पाच्या मखरचे प्रदर्शन भरवले जाते. साधारण 1200 रुपयांपासून येथील मखरची किंमत सुरू होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : गणेशोत्सव म्हटलं की तयारी आणि खरेदीची लगबग येते. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोणतीही कमी राहू नये, यासाठी भाविक जल्लोषात तयारी करत असतात. अशातच दादरच्या वनमाळी सभागृह येथे गणेशोत्सवासाठी एकापेक्षा एक आकर्षक मखर आपल्याला पाहायला मिळतील.

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस उतरल्यावर एक मिनिटाच्या अंतरावर वनमाळी सभागृह आहे. या सभागृहात वर्षानुवर्ष बाप्पाच्या मखरचे प्रदर्शन भरवले जाते. साधारण 1200 रुपयांपासून येथील मखरची किंमत सुरू होते. लाकडाचे, इको फ्रेंडली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कापडी मटेरियल युज करून मखर बनवण्यात येतात. अगदी पुठ्ठा ते लाकडी मखर या सर्वांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण आणि रंगीबेरंगी मखर पहायला मिळतील.

advertisement

पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेत असाल तर आताच थांबा, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम

साधारण दीड फुटापासून ते पाच फुटापर्यंतचे मखर इथे पहायला मिळतात. मोरपंखी, मंदिर, काचेचे आरसे अशा वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला मखरमध्ये पहायला मिळतात. यंदाच्या वर्षी जास्त मागणी काचेची आणि लाईट्सची सजावट केलेल्या मखरची आहे. काचेची सजावट असलेले चंदेरी रंगाचे मखर सध्या ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळतात. शिवाय लाईट्सचे बॅकग्राउंड असलेल्या मखरमुळे बाप्पाचे रुप आणखी खुलून दिसते.

advertisement

गोकुळाष्टमीला हवेत सुंदर दागिने, ठाण्यातील या मार्केटमध्ये मिळतील, तेही स्वस्त दरात, VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

लाईट्सच्या या रेडीमेड मखरमध्ये लाईट्स असल्यामुळे तुम्हाला वेगळी लाईट्स लावण्याची गरज नाही, त्यामुळे पैसे आणि वेळेची देखील बचत होते. फक्त मुंबईतून नाही तर ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच नाशिक, सोलापूर, कोल्हापूर म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मंडळी इथे मखर खरेदीसाठी गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील मखर खरेदीसाठी येथे गर्दी जमली आहे. जर तुम्हाला तुमच्या बाप्पासाठी मखरची खरेदी करायची असेल तर दादरच्या वनमाळी सभागृहाला नक्की भेट द्या.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
गणेशोत्सवाची लगबग!, मार्केटमध्ये आले एकापेक्षा एक आकर्षक मखर, किंमत पाहून तुम्हालाही होईल आश्चर्य, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल