मुंबईमध्ये सुरू आहे स्कॅम
एलपीजी सिलेंडरवरून गोंधळ सुरू असतानाच सायबर गुन्हेगारांनी 24 तासांमध्येच मुंबईत 7 वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी 8 लाख 40 हजार रुपये नागरिकांकडून लुटले आहेत. सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना शिकार बनवण्यासाठी APK फाईल पाठवली आणि त्यांना लिंकवर क्लिक करायला लावलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
advertisement
सायबर गुन्हेगारांनी महानगर गॅस लिमिटेट म्हणजेच MGL च्या नावाने APK फाईल पाठवली. मुंबईमधील बोरिवली आणि खार भागामध्ये 3-3 आणि पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये 1 प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी APK फाईल पाठवून नागरिकांची बँक खाती खाली केली.
पोलीस तपास सुरू
मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पीडित नागरिकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच अनोळखी नंबर, लिंक आणि APK फाईलवर क्लिक करू नका, सावध राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
