सिंधुदुर्ग - नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. या नवरात्रोत्सवामध्ये देवीचा जागर केला जातो. देवीला रोज गोड नैवेद्य दाखवला जातो. देवीला नैवेद्य दाखवला जाणारा असाच एका पदार्थ म्हणजे शेवयाची खीर. आज आपण शेवयाची खीर ही रेसिपीबाबत जाणून घेणार आहोत.
साहित्य : एक जाड बुडाची कढई, साजूक तूप, एक पेला शेवया, उपलब्ध ड्रायफ्रूट्स, सव्वा पेला साखर, सव्वा लिटर दूध, सव्वा लिटर दुधाव्यतिरिक्त, अडीज पेले दूध शेवया शिजवण्यासाठी, दोन चमचे कस्टर्ड पावडर (दुधात खलवून ठेवलेली), चिमूटभर मीठ, वेलची पावडर किंवा रेडिमेड दूध मसाला.
advertisement
कृती - प्रथम एक जाड बुडाचे भांडे गॅसवर गरम झाल्यानंतर त्यात दोन मोठे चमचे तूप घालावे. तूप थोडे गरम झाल्यानंतर त्यात एक पेला शेवया भाजून घेणे. शेवया रोस्टेड नसतील तर नीट खरपूस रंगावर भाजून घेणे. शेवया भाजताना त्यात उपलब्ध ड्रायफ्रूट्स सुद्धा शेवयांसोबत भाजून घ्यावेत.
शेवया नीट भाजल्यानंतर अडीज पेले दूध घालून शेवया नीट शिजवून घ्याव्या. शेवया नीट शिजल्या की त्यात सव्वा लीटर दूध घालून नीट उकळी काढाव्या. खीरला एक उकळी आल्यानंतर त्यात खलवून ठेवलेली कस्टर्ड पावडर घालून खीर सतत ढवळत राहावी. नंतर सव्वा पेला साखर खीरमध्ये मिक्स करावी.
साखर मिक्स केल्यानंतर 5 ते 6 मिनिटे फेरीला पुन्हा एक उकळी देणे. अगदी चिमूटभर मीठ चवीसाठी टाकावी. खीरचा रंग बदलली आणि खीर दाटसर झालेली दिसली की गॅस बंद करावा आणि वरुन वेलची पावडर किंवा दूध मसाला टाकावा. यानंतर खीर झाकावी. साधारण तासाभरानंतर खीर खाण्यासाठी तयार असेल. तर मग तुम्हीही शेवयांची खीर अशाप्रकारे बनवू शकता.