Dharashiv Inspiring News : 30 वर्षांपूर्वी बेकरी अन् जनरल स्टोअर्स व्यवसाय सुरू, आता स्वत:ची इंग्लिश मीडियम स्कूल अन् कॉलेज, VIDEO

Last Updated:

dharashiv inspiring story - एकेकाळी बस स्थानकावर जनरल स्टोअरचा व्यवसाय सुरू केलेल्या विकास गायकवाड यांनी शिक्षणाची दारे उघडले आहेत. डीएमएलटी नर्सिंग त्याचबरोबर इंग्लिश स्कूल अशा शिक्षण देणाऱ्या संस्था उभा केल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर यशस्वी कसे होता येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.

+
विकास

विकास गायकवाड धाराशिव

उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव - मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर व्यक्ती आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून नक्कीच प्रगती करू शकतो, हे एका व्यक्तिने सिद्ध करुन दाखवले आहे. 30 वर्षांपूर्वी बेकरी आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय सुरू करणाऱ्या या व्यक्तीने आतापर्यंत स्वत:ची इंग्लिश मीडियम स्कूल तसेच कॉलेजचीसुद्धा स्थापना केली आहे. नेमकी ही व्यक्ती कोण आहे, त्यांचा हा जिद्दीचा तसेच प्रेरणादायी प्रवास नेमका कसा झाला, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
विकास गायकवाड असे या व्यक्तीचे नाव आहे. 1991 मध्ये त्यांनी उमरगा बस स्थानकात विकास बेकरी अँड जनरल स्टोअर्सच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यावेळी 15 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. गेल्या 30 वर्षात जिद्द, चिकाटी, सातत्य याच्या जीवावर त्यांनी व्यवसायाची भरभराट केली आणि व्यवसायामुळे विकास यांचे जीवन बदलून गेले आहे.
advertisement
उमरगा परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागायचे. त्यामुळे 2001 मध्ये त्यांनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज सुरू केले.
दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली, काय आहे यामागची कहाणी?, VIDEO
आत्तापर्यंत जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांनी भविष्याचा वेध घेत ग्रामीण भागात इंग्रजी शाळेचे महत्त्व ओळखले आणि भुयार चिंचोली येथे 2015 मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. पण आज रोजी जवळपास 200 विद्यार्थी त्यांच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.
advertisement
भविष्यातील गरजा ओळखून नवनवीन व्यवसायाचा अभ्यास करून त्या व्यवसायात उतरले पाहिजे. आयुष्यात अनेक अडचणी येतात. येणाऱ्या अडचणींकडे सकारात्मक पाहिले की त्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढता येतो, असा संदेशही त्यांनी सध्याच्या तरुणांसाठी दिला आहे.
एकेकाळी बस स्थानकावर जनरल स्टोअरचा व्यवसाय सुरू केलेल्या विकास गायकवाड यांनी शिक्षणाची दारे उघडले आहेत. डीएमएलटी नर्सिंग त्याचबरोबर इंग्लिश स्कूल अशा शिक्षण देणाऱ्या संस्था उभा केल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर यशस्वी कसे होता येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv Inspiring News : 30 वर्षांपूर्वी बेकरी अन् जनरल स्टोअर्स व्यवसाय सुरू, आता स्वत:ची इंग्लिश मीडियम स्कूल अन् कॉलेज, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement