मुंबई - भारतात नुकताच ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. यासोबतच आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची काळी पट्टी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान असे नवे रुप न्यायदेवतेला देण्यात आले आहे. मात्र, आधी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का लावलेली होती आणि हातामध्ये तलवार का असायची, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
अॅडव्होकेट संतोष दुबे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे रोमन संस्कृतीतील प्रतीकांच्या आधारे तयार करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू आणि तलवार असणारी रोमन पोशाखातील न्यायदेवता 'लेडी जस्टिशिया'ची मूर्ती भारताची न्यायादेवता म्हणून आजवर स्विकारण्यात आली होती.
या देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. त्याचा देखील खास अर्थ होता. न्यायदेवता नेहमी निष्पक्ष न्याय करेल हा त्याचा अर्थ होतो. कुणाला पाहिल्यानंतर न्याय एका पक्षाकडे झुकू शकतो. त्यामुळे या देवतेने डोळ्यांना पट्टी बांधलेली असायची. तसेच न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हे दंड देण्याचे प्रतीक होते. म्हणून न्यायदेवतेच्या हातात तलवार देण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार न्यायदेवतेची मूर्ती नव्याने बनवण्यात आली आहे.
दिवाळीत गिफ्ट करा छान असा ड्रायफ्रूट सेट, पण मुंबईत कुठे मिळतो, दरही जाणून घ्या..
सर्वात आधी न्यायाधीशांच्या ग्रंथालयात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत. त्याचबरोबर डाव्या हातात तलवारीच्या जागी संविधान आहे. तर उजव्या हातात पहिल्यासारखाच तराजू आहे. सरन्यायाधीश न्यायाधीश यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण इंग्रजांच्या वारशातून पुढे गेले पाहिजे, असे सरन्यायाधीश न्यायाधीश चंद्रचूड यांचे मत आहे. ते सर्वांना समान लेखतात. त्यामुळे न्यायदेवतेचे स्वरुप बदलण्यात यावे. देवीच्या हातामध्ये तलवार नाही तर संविधान हवे. त्यामुळे समाजात संविधानाच्या तत्त्वावर न्याय देण्यात येतो हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल.