महिलेला जोरात धक्का देऊन खाली पाडले अन् पुढे
मंजुळा दमडे (वय 55) या पारगाव येथून भंगारपाडा येथे आपल्या घरी जात होत्या. त्या रस्त्याने चालत असताना अचानक पाठीमागून आलेल्या एका इसमाने त्यांना जोरात धक्का दिला. अचानक झालेल्या धक्क्यामुळे मंजुळा खाली कोसळल्या. त्यानंतर त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
advertisement
या प्रकारात मंजुळा खाली पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली असून मंगळसूत्र खेचताना त्यांच्या मानेलाही इजा झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना मदत केली. त्यानंतर मंजुळा यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अलीकडच्या काळात पनवेल आणि परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी गर्दी नसलेल्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
