कल्याण ते नवीन मुंबई प्रवास होणार सुसाट!
मेट्रो लाईन 12ला ऑरेंज लाइन म्हणून ओळखले जाणार असून ही मेट्रो लाईन 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) चा विस्तारीत भाग आहे. मागील वर्षी या मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. सध्या या प्रकल्पाचे खांब उभारण्याचे काम जोरात सुरू आहे आणि वर्षभराच्या आत बांधकामात लक्षणीय प्रगती दिसून आली आहे. इंटरनेटवरील काही युजर्सच्या माहितीनुसार मेट्रो 12 हा भारतातील सर्वात वेगाने उभारला जाणारा प्रकल्प ठरतोय. या प्रकल्पात मार्गिका आणि डेपोचे काम एकाच वेळी सुरू असणे ही एक अनोखी बाब आहे.
advertisement
या मार्गिकेची एकूण लांबी 22.17 किलोमीटर आहे आणि यावर 19 स्थानके असणार आहेत. मेट्रोचा प्रवास एपीएमसी कल्याण पासून सुरू होऊन अमनदूत तळोजा पर्यंत असेल. या मार्गिकेत दोन इंटरचेंज स्थानके असतील. पहिले, कल्याण एपीएमसी जे मेट्रो लाईन 5 शी जोडले जाईल आणि दुसरे अमनदूत तळोजा जे मेट्रो लाईन 1 शी जोडले जाईल. या मेट्रो प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास आता फक्त 45 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होऊन सेवेत येईल.
कोणती असतील स्थानके?
कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, तळोजा या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि आरामदायक होणार आहे.