'मुंबई मेट्रो 3' च्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, "विधानभवनावरील A- 2 गेटवरून सामान्य प्रवाशांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन्हीसाठी सुरू झालेले आहे." लिफ्ट सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि गर्दीच्या वेळी स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, A- 2 गेटच्या एक्झिटमुळे मनोरा– नवीन आमदार निवास आणि वाय. बी. चव्हाण सेंटर या दोन्ही ठिकाणी थेट प्रवेश मिळतो, जिथे नियमित वर्दळ असते. यामुळे, गर्दी लवकरात लवकर कमी होते आणि स्थानकातील इतर प्रवेशद्वारांवरील कोंडी कमी सुद्धा कमी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.
advertisement
विधान भवन मेट्रो स्थानकावरील B- 4 गेट सुरू झाल्याच्या एक महिन्यानंतर A- 2 गेटबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. B- 4 गेट प्रवाशांसाठी सुरू करण्यात आले असले तरी, गेट B- 5 अजूनही बंद असून ते 25 मार्च रोजी पुन्हा उघडणार आहे. अधिकार्यांनी यापूर्वी माहिती दिली आहे की, सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीवरील निर्बंधांमुळे काही गेट्स तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक होते. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी, कारण स्थानकातील एन्ट्रीचे रूट्स काही प्रमाणावर बंद असल्यामुळे प्रवाशांना येण्या- जाण्यासाठी परिणाम होण्याची शक्यता आहे.
