नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोरबे धरण आता 93 टक्के भरल्याने नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मोरबे धरण परिसरात 9 ऑगस्टपर्यंत तीन वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हे धरण आता 93.08 टक्के भरले आहे.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे जूनअखेरीस 50 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात होता. त्यामुळेच पावसाच्या सुरुवातीला पाणी कपात करण्याची वेळ आली. मात्र, जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीलासुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आता धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी 1.38 मीटर पातळी शिल्लक राहिली आहे. यामुळे आता पुढील तब्बल 306 दिवस पुरेल इतका पाठीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. म्हणून आता नवी मुंबईकरांची संपूर्ण वर्षभरासाठीची चिंता मिटली आहे.
advertisement
पुण्यात मराठा आरक्षण शांतता रॅली, वाहतुकीत झाला हा महत्त्वाचा बदल, संपूर्ण माहिती
ऑगस्टमध्येच धरण भरणार? -
मोरबे धरण अनेकदा सप्टेंबरमध्ये पूर्ण भरत होते. मात्र, यावर्षी ऑगस्टमध्येच धरण पूर्ण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर पुढील पावसाळा सुरु होईपर्यंत पुरेल एवढा साठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती
दोन वर्षातील फरक -
2022 मध्ये 9 ऑगस्टपर्यंत धरण परिसरात 2264 मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच तेव्हा धरणाची पातळी 82.3 मीटर इतकी आहे. मात्र, आता यंदाचा विचार केला असता यावर्षी आतापर्यंत 2937 मीटर एवढा पाऊस झाला आहे. यामुळे धरणात 93.08 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच धरणाची पातळी 86.69 मीटरपर्यंत वाढली आहे.